भाजपकडून ‘मिशन मुबंई’; निवडणुकीसाठी 20 सदस्यांची समिती, कोणाकोणाचा समावेश?


मुंबई :आगामी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. मुंबई भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित साटम यांनी 20 सदस्यांची समिती स्थापन करून निवडणूक जिंकण्याची जोरदार तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपने स्थापन केलेल्या या समितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित साटम, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या समितीत प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, पराग आलवाणी, मिहीर कोटेचा, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. मनीषा चौधरी आणि चित्रा वाघ यांचा महिला प्रतिनिधित्व म्हणून समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय सरचिटणीस राजेश शिरसाटकर, गणेश खानकर, आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता पंकजकर यांनाही मुंबई भाजप संघटना बळकट करण्यासाठी समितीत जबाबदारी देण्यात आली आहे. मनपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा समावेश करून प्रशासकीय अनुभवालाही महत्त्व देण्यात आले आहे. समितीच्या स्थापनेची अधिकृत घोषणा 18 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे.

       

दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा परिस्थितीत भाजप आणि महायुतीच्या या निर्णयामुळे राजकीय समीकरणाला नवी दिशा मिळू शकते. मजबूत संघटनात्मक रचना आणि अनुभवी नेत्यांच्या पथकाच्या माध्यमातून महायुतीने पालिका निवडणूक गांभीर्याने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!