पुण्यात भाजपचा बंडखोरांना हिसका ; तब्बल 69 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन


पुणे : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपने मोठे पाऊल उचलले आहे.पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवल्याप्रकरणी भाजपने तब्बल 69 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी सहा वर्षासाठी निलंबन केले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ॲक्शन मोडवर आला असून पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही पक्षाकडून केल्या आहेत. भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

निलंबाची कारवाई करण्यात आलेल्या मध्ये शिवाजीनगर मतदार संघातून 7 जणांचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून 6,कसबा विधान मतदारसंघातून 6, हडपसर विधानसभा मतदारसंघातून 19 तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 9, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 8, पुणे कँटोमेट विधानसभा मतदारसंघातून 9 आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून 4 असे एकूण 69 जणांचा समावेश आहे.

दरम्यान यातील अनेक कार्यकर्ते माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी राहिलेले आहेत. अमोल बालवडकर,धनंजय जाधव, किरण बारटक्के सचिन दांगट मोहिनी देवकर उज्वला गौड हरीश परदेशी प्रीतम नागापुरे संगीता ठोसर संदीप लोणकर मधुकर मुसळे यांच्यासह 69 जणांचे निलंबन केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!