पोटनिवडणुकीत भाजपची मोठी चाल; या नेत्याला दिलं तिकीट, विरोधकांचं टेन्शन वाढलं…


मुंबई : राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अत्यंत सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत आमदारपदापर्यंत मजल मारली होती.

आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील २०२६ च्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी त्यांच्या नावाला अधिकृत मंजुरी दिली असून यासंदर्भातील पत्रही जाहीर करण्यात आले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर भाजपाने त्यांच्यावरच विश्वास दाखवत उमेदवारी दिली असून, आता वडिलांच्या जागी अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांनी दावा केला होता. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही या पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न केले. तिकिट मिळवण्यासाठी त्यांनी मोठी मोहीम राबवत आपणच या निवडणुकीसाठी पहिली पसंती असल्याचे वारंवार सांगितले. मात्र अखेर उमेदवारी इतरांना मिळाल्याने राहुरी पोटनिवडणुकीत त्यांच्या पुढील भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे वस्त्र धारण करत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचप्रमाणे सुजय विखे पाटील यांनीही तिकिट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र अखेरीस भाजपाने दोघांनाही बाजूला ठेवत थेट अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. जनभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

अखेर पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्याआधीच अक्षय कर्डिले यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता अक्षय कर्डिले यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. शिवाजीराव कर्डिले आणि पंकजा मुंडे यांच्यातही जवळचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!