भाजपची मोठी कारवाई!माजी नगराध्यक्षासह चौघांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण?


पुणे : भारतीय जनता पक्षाने कोकणामध्ये मोठी कारवाई करत माजी नगराध्यक्षांसह चौघांची हकालपट्टी केली आहे.चिपळूण नगरपरिषद निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह ४ पदाधिकाऱ्यांची भाजपने पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणे आणि उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविल्याचे पुराव्यासह आढळून आल्यामुळे माजी नगराध्यक्षांसह चौघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर या सर्वांविरोधात ही कारवाई केली आहे.

चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहरप्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणे या सर्वांना भोवले आहे. सुरेखा खेराडे चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष तर परिमल भोसले निलेश राणे यांचे खंदे समर्थक होते. भाजपने केलेल्या कडक कारवाईमुळे चिपळूणमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सुधीर सुधाकर पानकर, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष परिमल भोसले या सर्वांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!