भाजपची मोठी कारवाई, नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणारे 16 पदाधिकारी निलंबित

पुणे:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाने उमेदवारांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या 16 बंडखोरांवर भारतीय जनता पक्षाने कठोर कारवाई केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत भाजपचे वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्यासर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे.
दरम्यान, निलंबित सदस्यांमध्ये जिल्हा चिटणीस करूणा कल्ले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष वैभव उलेमाले, सदस्य राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, वाशिम शहर उपाध्यक्ष संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, उत्तर आघाडी प्रकोष्ठाचे सावंतसिंग ठाकूर, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सेलचे प्रमुख सचिन पेंढारकर, महिला शहर उपाध्यक्ष अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांचा समावेश आहे.

दरम्यान पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचना जिल्हाध्यक्षांनी केले.

