भाजपची मोठी कारवाई ; ऐन निवडणुकीत पक्षातून 15 जणांची हकालपट्टी, काय आहे कारण?

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना भाजपने अमरावतीत मोठी कारवाई केली आहे. पक्षात गटबाजी करणारे आणि पक्ष निर्णयांना विरोध करणाऱ्या पक्षातील 15 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपने हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर , नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे . पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे, पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने नागपूर,मुंबई आणि आता अमरावतीमध्ये कारवाई केली आहे.

भाजपने अमरावतीतील भाजप पक्षातील 15 पदाधिकारी आणि सदस्य निलंबन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यानी ही कार्यवाही करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका तसेच अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान याआधी नागपूर भाजपमधील 32 जण आणि मुंबई भाजपतील 26 पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.मुंबईत पक्षशिस्त मोडणाऱ्या 26 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे,
