मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार…!


मुंबई : सध्या सर्वच पक्ष 2024 च्या निवडणुकीची तयारी करत आहेत. असे असताना आता 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागा लढवण्यासाठी चांगले उमेदवार नाहीत. तसेच भाजपला शिंदे गटासह इतर मित्रपक्ष आणि अपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील.

शिंदे गटाकडे या 40 आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर भाजप शिंदे गटासाठी जास्त जागा सोडणार नाही. यामुळे आता अंतिम निर्णय काय होणार हे लवकरच समजेल.

भाजपकडे आधीच 43 टक्के मते असून आपल्याला 51 टक्के मतांची गरज आहे. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, असेही बावनकुळे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!