भाजपला बसणार धक्का! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर …!
बीड : राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी समोर येत आहेत. यामुळे कधी काय घडेल सांगता येत नाही. आता राज्यात शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला.
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच आता पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्या देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते देखील मध्यस्थी करत असल्याचे सांगितले जात आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर तर सर्वांनाच ज्ञात आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नंतर पंकजा मुंडे यांचे अजून कुठेही पुनर्वसन झाले नाही.
पंकजा मुंडे सध्या महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामुळे येणाऱ्या काळात त्या निर्णय घेऊ शकतात.