BJP : भाजपच्या दोन आमदारांमध्ये जोरदार राडा, राज्यभरात रंगली चर्चा, नेमकं प्रकरण काय?


BJP : शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातील दोन आमदारांमधील वाद समोर आला आहे. या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे.

सोलापूर हे खेडे आहे या वक्तव्यावरून भाजपच्या दोन आमदारात शाब्दिक टोलेबाजी झाली आहे. या प्रकाराची चर्चा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे राज्यात सुरु झाली आहे.

सोलापूर हे मोठे खेडं आहे. त्याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. त्याचा विचार केला गेला पाहिजे, असे विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केले. मात्र यातील सुभाष देशमुख यांच्या ‘खेडं’ या शब्दाला भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. BJP

विजयकुमार म्हणाले की, सुभाष बापू खेडे का म्हणाले मला कळले नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, सोलापूर दक्षिणेसाठी प्रवेशद्वार म्हटले जाते. देशाच्या प्रत्येक भागाला सोलापूर जोडले गेले आहे.

तसेच सोलापुरात जमीन स्वस्त आणि मुबलक मॅन पॉवर आहे. असे देखील ते म्हणाले आहेत सोलापूर हे मोठे खेडं असे सुभाष देशमुख म्हणाले आहेत त्यामुळे आता सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात शाब्दिक वाद होताना पाहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!