ओबीसींना घाबरवण्याचं काम भाजपाकडून सुरू, आता शरद पवार गटाकडून राज्यभरात मंडल यात्रेचे आयोजन, रोहित पवारांचा पुढाकार..


नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशात मंडल आयोग लागू करण्याविरोधात भूमिका घेत भाजपाने कमंडल यात्रा काढली.

परंतु देशात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याचं काम मुख्यमंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी केलं. पण सध्या ओबीसींना घाबरवण्याचं काम सध्या सुरु असून भाजपाचा खरा चेहरा लोकांपुढं आणण्यासाठी नागपूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या ‘मंडल यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन देशमुख, अमर काळे, राजेंद्र शिंगणे, रमेश बंग, सलील देशमुख, गुलाबराव गावंडे, प्रकाश गजभिये, शरद दादा तसरे, चरणभाऊ वाघमारे, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाच्यावतीने ‘मंडल यात्रे’ची जबाबदारी असलेले राज राजापूरकर तसंच स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते.

पुढील ४० दिवस राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात १४ हजार ८७७ कि.मी. प्रवास करणार आहे. या प्रत्येक ठिकाणी ‘मंडल यात्रे’चं स्वागत करण्याची आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका, भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे.

त्याचा कसा राजकीय फायदा उठवला जातो हे लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाची आहे, असेही आमदार रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!