भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरा आणि दीरावर आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप, घटनेने उडाली खळबळ…

Bjp : भाजप खासदाराच्या संबंधीत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एका भाजप खासदाराच्या बहिणीने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला आहे. फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांची बहिण रीना सिंहने आपल्या सासरच्यांवर मारहाणीचा आरोप केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

याबाबत रीना सिंहने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रीना सिंहने यांनी म्हटले आहे की, दीर राजेश आणि सासरे लक्ष्मण सिंह यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. सासरे आणि दीराने मिळून तिच्यावर हल्ला केला. तिला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रीना सिंह खासदार मुकेश राजपूत यांची बहिण आहे.
याबाबत तिने म्हटले की, मी बाथरुममध्ये आंघोळ करत असताना सासरे आणि दीराने मिळून खिडकीतून माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी, सासरे आणि दीराच्या या कृतीला विरोध केला, तेव्हा त्यांनी शिवीगाळ सुरु केली. मारहाण केली. सासऱ्यांनी काठीने मारलं. जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याने तिने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मुकेश राजपूत हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांची बहिण रीना सिंह यांनी सासरच्यांवर मारहाणीचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. आपल्यासोबत दुर्व्यवहार करण्यात आला. आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला, असेही म्हटले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर लक्ष्मण सिंह, राजेश आणि गिरीश यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दोषींविरोधात कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे सहावर पोलीस ठाण्याचे प्रभारी चमन गोस्वामी यांनी सांगितले आहे.