भाजप आमदाराचा लेटरबॉम्ब ; निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून ठिणगी,वरिष्ठांचं टेन्शन वाढलं!


पुणे : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता जिल्हा तसेच तालुका पातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुका तोंडावर असतानाच आता भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जागावाटपावरून एक लेटरबॉम्ब टाकून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुधीर गाडगीळांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. गाडगीळांच्या या लेटर बॉम्बमुळे सांगलीच्या राजकाणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच काँग्रेस मधून भाजपात आलेल्या जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जयश्रीताई गटाला 22 जागा देऊ, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. यालाच आक्षेप घेत सुधीर गाडगीळ यांनी थेट पत्र लिहित या जागावाटपाला विरोध दाखवला आहे.

दरम्यान आता निवडणूकीच्या तोंडावर सांगली भाजपामध्ये गाडगीळ विरुद्ध जयश्रीताई पाटील गट असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याच संभाव्य संघर्षामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हा वाद भाजपाचे वरिष्ठ नेते नेमका कसा सोडवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!