पुण्यात भाजपनं डाव टाकला; मविआचे अनेक दिग्गज नेते हाती घेणार ‘कमळ’


पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुण्यात भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळाल आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली असून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. पुण्यात लवकरच भाजपमध्ये मेगा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला धक्का बसणार आहे.

शिवसेनेच्या नगसेवकांनी पक्षाची साथ सोडली असून भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत इतर पक्षांमध्ये गळती सुरूच आहे. हे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.हा पक्षप्रवेश पुण्यातच होणार आहे.

दरम्यान पुण्यातील कोथरूडची देखील समीकरणे बदलली आहेत. शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठाचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संजय भोसले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उपशहर प्रमुख होते. राष्ट्रवादीचे अनेक नेते ही आज प्रवेश करण्याची शक्यता आहेत.

दरम्यान, पुण्यात भाजपची पुन्हा एकदा मेगा प्रवेश सुरू झाला आहे. २५ डिसेंबरला मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. पुण्यातील महत्त्वाच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!