BJP : नांदेड बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, भाजपला मोठा धक्का…
BJP सध्या एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत मुखेड बाजार समिती वगळता भाजप-महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
मुखेड बाजार समितीमध्ये भाजपने १८ पैकी १२ जागा जिंकून बहुमत मिळवले मात्र इतर बाजार समितीमध्ये भाजपला पराभव मिळाला आहे. बीलोलीत १८ पैकी १७ जागा महावी आणि एक जागा भाजपला मिळाली आहे.
कोंडलवाडी येथे देखील १८ पैकी १७ जागा महावी आणि एक जागा भाजपने जिंकली आहे. माहुरमध्ये १८ पैकी १४ जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उठाबा गटाच्या आघाडीने जिंकल्या आहेत. तर ४ जागा भाजप, काँगेस युतीने जिंकल्या.
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. चिखलीकर यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या १८ पैकी १६ जागा मिळाल्या आहेत.
निकाल पुढील प्रमाणे..
– बिलोली – १८ पैकी १७ जागा महावि , १ भाजप
– कोंडलवाडी १८ पैकी १७ जागा महावि , १ जागा. भाजप
– उमरी – १८ पैकी १८ जागा महावि
माहुर – १८ पैकी १४ जागा राष्ट्रवादी उबाठा आघाडी , ४ जागा भाजप – काँगेस युती
लोहा – १८ पैकी १६ महावि , ०२ जगा भाजप
मुखेड – १८ पैकी १२ जागा भाजप, मतमोजणी सुरू