BJP : शिरुर-हवेली’ची जागा गमावल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मुळावर घाव! हवेलीत भाजपचे अस्तित्व मुळासकट उखडण्याची शक्यता..


जयदिप जाधव

BJP उरुळी कांचन : भाजपला जनसंघाच्या रुपाने विजय मिळवून देणारा व २००९ मध्ये पूर्व हवेली तालुक्याचा सामाविष्ठ करुन असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेशाचे धैर्य दाखविलेल्या शिरुर-हवेली मतदारसंघात महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने या निर्णयाने हवेली तालुका भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपची प्रबळ संघटना असून देखील भाजपला हा मतदारसंघ न मिळाल्याने भविष्यात पुणे जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे पाहता भाजपवर राष्ट्रवादीचा मोठा घाव बसण्याची जखम भाजप कार्यकर्त्यांना सोसावी लागली असून पुढील काळात हवेलीत भाजपचे अस्तित्व मुळासकट उखडण्याचा शक्यतेने पक्षात चलबिचलता सुरू झाली आहे.

 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या अधिपासून मूळ काँग्रेसच्या विचारांपासून१९७८साली वेगळा विचार देणाऱ्या शिरुर मतदारसंघात २००९  मध्ये हवेली तालुक्याचा सामाविष्ठ झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील तत्कालीन राजकारण्यांचा भूमिकेला झुगारुन हवेली तालुक्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी २०१४ साली दिवंगत नेते बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या हवेलीतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मतदारसंघातील व जिल्ह्यातील नेतृत्व झिडकारले होते. हवेली तालुक्यातील बाजार समितीचा विषय असो की कारखान्याचा विषय राष्ट्रवादीने सत्ता असून मदत न करण्याची भूमिकेची सल मनात ठेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची भूमिका घेतली होती. हा निर्णय राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फटका देण्याचा ठरून या ठिकाणी राष्ट्रवादी २०१४ साली पराभव होण्यास कारणीभूत ठरला होता. या पक्षांंतराचे फटके जिल्ह्यात राष्ट्रवादीला बसून जिल्हात अनेक भाजप प्रवेश घडले होते.

 

२०१४ मध्ये भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांना दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या भक्कम पाठबळाची मदत मिळाली. बाबूराव पाचर्णे यांनी या कार्यकर्त्यांना गळ्याचे ताईत करुन अगदी राज्याचे मुख्यमंत्री तसेच महत्त्वाचे नेतेमंडळींच्या जवळ नेऊन ठेवले. कार्यकर्तेही पाचर्णे यांच्या शिडीने राजकारणात नवे आयाम गाठण्याची स्वप्ने बघू लागली. मात्र जिह्यातील पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या भूमिकेची ‘री’ ओढत सहकारातील अस्तित्व गमाविलेल्या हवेली तालुक्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्याने २०१९ मध्ये पाचर्णे यांचा मोठा पराभव होण्यास कारणीभूत ठरला होता.

 

आता २०२४ मध्ये राज्यात अनेक घडामोडी घडत भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाशी तह केल्याने जिल्ह्यातील सर्व नेतृत्वाची सूत्रे राष्ट्रवादीच्या नेत्याशी एकवटल्याने हवेली तालुक्यात पक्षाची उरली सुरली भाजपाची जागावाटपाची उमेद संपली असून शिरुर -हवेलीत भाजपची हक्काची जागा गेल्याने भाजपचे कार्यकर्ते हे चांगलेच कासावीस झाले आहे.ज्यांच्याशी संघर्ष करायचा त्यांच्याच दारात उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न सामान्य कार्यकर्त्यांना खटकत असून त्यांनाच सत्तेच्या माध्यमातून महत्वाची कामे करण्यासाठी गळ घालावी, लागत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

 

अडीच वर्षाच्या काळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात डावलणे, पक्ष नेतृत्वाने तक्रारींची दखल न घेणे, स्थानिक नेतृत्वाने वरील आदेशाचे पालन करण्यास भाग पाडणे या कार्यकर्त्यांच्या मूळावर घाव घालण्याचा सूचनेत हवेली तालुक्यात नेतृत्वाने सावध भूमिका घेणे व गमाविलेल्या हक्काच्या जागेने भाजपचे अस्तित्व मूळावर येण्याचा शक्यतेने भाजपचे कार्यकर्ते पक्षांतर करण्याचा मानसिकतेत गेल्याची चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!