ठाकरेंच्या ‘या ‘आमदाराला भाजपच्या नेत्याची पक्षप्रवेशाची खुली ऑफर…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदाराला भाजपच्या दिग्गज नेत्याने महायुतीत येण्याची खुली ऑफर दिली आहे. धाराशिवच्या उमरगा लोहारा येथील ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींना राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,धाराशिवच्या उमरगा-लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र झाले असतात त्यांना भरसभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली. प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील कामाची मागणी केली असता, पाणी कुठल्या वळणावर आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे…पाणी तर आम्हीच देणार,”असे म्हणत विखे पाटील यांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान राज्यात काँग्रेस,उद्धव ठाकरे गट सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराला दिलेल्या ऑफरने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता यावर ते काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.