आरोप खोटे असले तर ते सिद्ध करा, तुमच्या घरी धुणीभांडी करतो, भाजप नेत्याचे कुल यांना आव्हान


 

दौंड : तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील कथित भ्रष्टाचारासंदर्भात काल वरवंड येथे सभा झाली. या सभेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, शिवसेनेचे नेते शरद कोळी यांच्यासह शिवसेनेचे इतरही नेते उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र दिनादिवशी मी दौंड तालुक्यातील पाटस येथील मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यासमोर बसणार आहे. मी केलेले साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे विद्यमान आमदारांनी सिद्ध करून दाखवावे.

मी त्यांच्या घरी वर्षभर धुणीभांडी करीन असे आव्हान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांना दिले. यामुळे यावर राहुल कुल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी नामदेव ताकवणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रुपये दिले तरी कारखाना चालू झाला नाही, मात्र कर्नाटकच्या माणसाला कारखाना चालवायला दिल्यानंतर तोच कारखाना, तीच मशिनरी, तेच कामगार, तोच परिसर, तोच ऊस, मग कारखाना कसा चालू झाला? असा प्रश्न उपस्थित केला.

कारखाना जर चालूच होता तर मग बंद का ठेवला होता? सर्वसाधारण सभा झाली, एक ते बारा विषय मंजूर आणि आता ऐन वेळच्या विषयावर बोला असं म्हणत कोणाला बोलू न देता वर्षानुवर्ष अशाप्रकारे काम करता. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!