ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यात विधानसभेला भाजपच नंबर वन; ग्रामीण भागात इंदापूर वगळता राष्ट्रवादीचेच अधिराज्य..!!

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीतील कल काय असू शकेल याचा अंदाज ‘न्यूज एरिया इंडिया’ या सर्व्हे संस्थेने जाहीर केला आहे.

या सर्व्हेनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील २१ पैकी ९ जागा भाजपला, ८ जागा राष्ट्रवादीला आणि ४ जागा काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सर्व्हे जर खरा ठरला काँग्रेसच्या जागा जवळपास दुप्पट होतील.
याच संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. त्यानंतर आता या संस्थेने महाराष्ट्रातील मतदारसंघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते असा दावा करण्यात आला आहे.

Views:
[jp_post_view]
