BJP : जिल्ह्यात भाजपला ‘वाण नाही पण गुण लागला’! विधानसभेतील इच्छुकांच्या ‘अर्थिक’ कुवतेच्या कार्यकर्त्यांना संधी! निष्ठावंतांचा नाराजीचा सूर पक्षापासून हातभर लांब.!!


जयदीप जाधव

BJP उरुळी कांचन : राज्यातील सत्तेच्या प्रयोगात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या संगतीचा परिणाम जिल्ह्यात भाजपचा विस्ताराला झाला काय असा सवाल आता भाजपचे निष्ठावान विचारु लागले आहे. (BJP)जिल्ह्यात २०१४ च्या सत्तेपूर्वी बोटावर मोजायला असलेल्या भाजपने जिल्हा कार्यकारी जाहीर करताना विधानसभेला तीव्र इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बगलबच्यांना कार्यकारीणीत संधी दिली आहे. तर निष्ठावान व सामान्य कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडल्याने भाजप हा अर्थिक ताकदीवर कार्यकर्त्यांची निवड करताना परिक्षण करतो काय, असा सवाल भाजपच्या गोटातून विचारला जाऊ लागला आहे.

जिल्ह्यात भाजपने उत्तर व दक्षिण अशी विभागणी करुन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत.  या नियुक्तीनंतर उत्तर व दक्षिण अशी जंबो कार्यकारीणी पक्षाने जाहीर केली आहे. या कार्यकारणीत विधानसभेनुसार इच्छुकाच्या पसंतीला झुकते माप देऊन नियुक्त्या झाल्या आहेत. या नियुक्त्यांचे फक्त विधानसभा निवडणुकीचाच विचार केला असल्याचे चित्र आहे. या नियुक्त्यांत यापूर्वी पक्षात कार्यरत नसलेल्यापण विधानसभेला इच्छुकाच्या गोटात असलेल्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर बूथलेवरुन काम करणाऱ्या व पक्षासाठी राबविणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र विचार झाला नसल्याचे कार्यकर्त्यांच्या व्यथा आहेत.

काही पदाधिकारी तालुका सोडून वेगळ्या नेतृत्वासाठी अंधारात काम करतात त्यांना मात्र पक्षाने मोठी जबाबदारी सोपल्याची कार्यकर्ते उघड चर्चा करताना दिसत आहे. राज्यात भाजपला २०१४ च्या मोदी लाटेने सत्तेच्या केंद्रस्थानी बसविले असले तरी, भाजपला जिल्ह्यात मर्यादीत यश मिळाले मिळाले आहे. जिल्ह्यात एकाच विधानसभेत भाजपचा आमदार आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूकांत पक्षाचा सफाया झाला आहे. सहकार क्षेत्रातही भाजपला मर्यादीत यश मिळाले नसल्याने भाजपने पॅनेल उभे करणे टाळले आहे. हवेलीत बाजार समितीला संधी असतानाही भाजपने राष्ट्रवादीशी युती करून संधीसाधुपणाचे डाग लावून घेतले आहे.

जिल्ह्यात भाजपला २०१४ नंतर २०२२ ला सत्तेत सहभागी होण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. अशावेळी भाजप पक्षासाठी सत्तेतून पक्ष विस्ताराची मोठी संधी उपलब्ध झाली होती. मात्र पक्षाने सामान्य कार्यकर्त्यांची सामाजिक हिताशी निगडीत कामे सोडाच, पण कार्यकर्ते हे जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या भेटीसाठी तरसत राहिल्याची आवस्था आहे.तर विधानसभेच्या रांगेतील इच्छुकांंना अर्थिक ताकदीचे पदाधिकारी घडविण्यात अधिक रस असल्याने सामान्य कार्यकर्ते हे जनतेच्या निष्ठेच्या सवालांनी बेझार झाले आहेत.

तालुका कमिट्या नाही अन् कामेही नाहीत..

जिल्ह्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादी शी झगडून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आपले पक्षासाठी योगदान देत आले आहेत. मात्र पक्षाने त्यांना सत्तेच्या काळात तालुका कमेट्या, जिल्हा महसूल कमेट्या अशा कमिट्यांत सामील करुन घेणे कार्यकर्त्यांची उंची वाढविणारे होते.

पण कमिट्या सोडाच पण कार्यकर्त्यांचे फोन घेणेही इच्छुक नेतृत्वाला कमीपणाचे वाटत असल्याने जिल्हा चालविणाऱ्या नेतृत्वाची अजब पध्दत भविष्यात व्यासपीठ सोडून कार्यकर्ते मिळणार नाही, अशी होऊन बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!