एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार फुटणार? खास शिलेदारावर भाजपने दिली जबाबदारी, नेमकं घडतंय काय?


पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक जीवनापसून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. एका गंभीर जारावर संजय राऊत हे सध्या उपचार घेत आहेत. मात्र, आज महिन्याभरानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे म्हणत त्यांनी मंत्री गुलाबराव पाटीलयांच्यावर निशाणा साधला. तर शिंदे गटाचा कोथळा अमित शाह काढणार, असे देखील संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे भाष्य देखील संजय राऊत यांनी केले.

राज्यातं निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफळल्याचे दिसून आले. मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे सूतोवाच केले होते. महायुतीमधील वादांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार असे म्हणतच शिंदेंचे ३५ आमदार फुटणार. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

       

आजारपणामुळे राऊत हे महिनाभर राजकारणात सक्रीय नव्हते, आता उपचारानंतर आज ते माध्यमांसमोर आले, तेव्हा त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार टीका करत त्यांना खडे बोल सुनावले. शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार असा पुनरुच्चार त्यांनी केला.

निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि मंत्री म्हणतात १ तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत जशी सुरू आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार, हे मुळात नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुका लढवतच नव्हेत, आता एकेका निवडणुकीसाठी १०-१५ कोटीचं बजेट आहे, ५-६हेलिकॉप्टर आहेत. ही सत्तेतल्या 3 पक्षांतील स्पर्धा आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला.

इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय असा सवाल विचारत या राज्याची निवडणूक संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच उरलेली नाही अशीही, ही तिन्ही पक्षातील स्पर्धा आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!