BJP : भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दादासाहेब सातव यांची निवड, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष..


BJP वाघोली : (ता.हवेली) येथील दादासाहेब सातव यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. (BJP)

दादासाहेब सातव यांच्या निवडीनंतर पुणे जिल्हासह, वाघोली व परिसरातील अनेक नागरिकांकडून सातव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दादासाहेब सातव हे भाजपचे (BJP) एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात,त्यांनी अनेक वर्षे पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या किसान मोर्चाच्या कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून दादासाहेब सातव यांची निवड पक्षाच्या अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवडीनंतर बोलताना दादासाहेब सातव यांनी सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चा व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!