ऐन निवडणुकीत भाजप उमेदवाराचा कारनामा; 20 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, कारमधून बाहेर खेचलं; नंतर…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर हे गुन्हेगारी घटनामुळे चांगले चर्चेत आले आहे. अशातच राजगुरूनगरमधून मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासह पाच जणांनी मिळून २० वर्षीय तरुणाला,बेदम मारहाण केली आहे. पैसे वाटण्यावरुन झालेल्या गैरसमजातून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याच्या या कारनाम्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रोडवरील एका सोसायटीजवळ ही घटना घडली आहे. साई पिंगळे (वय वर्ष २०) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण कारमध्ये बसला होता. कारमधून बाहेर काढून त्याला मारहाण करण्यात आली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासह पाच जणांनी मिळून त्याला मारहाण केली.रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून, पैसे वाटण्यावरून झालेल्या गैरसमजातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर तरूणानं खेड पोलिसांकडे धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान निवडणूक काळात उमेदवारांकडूनच अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने, मतदार खरंच सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
