भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर…

मुंबई : भाजपने २४ जुलै रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर भाजपने गुजरातमधून बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केसरीदेवसिंग जाला, पश्चिम बंगालमधून अनंत महाराज यांना उमेदवारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना संधी दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, टीएमसीने राज्यसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेसाठी २४ जुलै रोजी राज्यसभेची निवडणुक होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ जुलै आहे. यामुळे भाजपने तयारी केली आहे. भाजपला 2024 मध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज करायची आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
Views:
[jp_post_view]