वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस ; धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू, पुण्यात हळहळ….


पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात एका 41 वर्षीय महिलेचा शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकून झालेल्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.शुभांगी नीलेश राऊत असं त्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (21 फेब्रुवारी) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि तो दिवस अखेरचा ठरला.

समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या शेतात शुभांगी राऊत या कुटुंबीयांसोबत वाटाणा आणि मसूर भरडण्याचे काम करत होत्या. त्यावेळी धान्यभरड यंत्र वेगाने सुरू होते. काम करत असताना त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस अचानक यंत्रात अडकला. यंत्राचा वेग आणि ओढ इतकी प्रचंड होती की काही क्षणातच त्या यंत्राकडे खेचल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

या घटनेनंतर तात्काळ त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असतानाच अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे कुटुंबावर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!