मोठी बातमी! बिपरजॉयचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले..
सुरत : बिपरजॉय चक्रीवादळ सध्या भारताच्या किनारपट्टीवर धडकत असून यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची खात्री बचाव पथके करत आहे.
चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि गुजरात सरकारच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. या चक्रीवादळाचा पाकिस्तानवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 15 जून रोजी गुजरातमध्ये तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय धडकण्याची शक्यता आहे. राज्यात विस्तृत निर्वासन योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे तयारी सुरू झाली आहे.
प्रशासनाने 7,500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. निर्वासन मोहीम आजही सुरू राहणार आहे. चक्रीवादळ बिपरजॉयचे अत्यंत तीव्र चक्री वादळमध्ये रूपांतर झाले आहे.
वीज, दूरसंचार, आरोग्य आणि पिण्याचे पाणी यासारख्या सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्याचे आणि कोणतेही नुकसान झाल्यास त्या त्वरित पुनर्संचयित करण्याचे निर्देश मोदींनी दिले. यामुळे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.