सर्वात मोठी बातमी!! वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड, CID कडून अखेर शिक्कामोर्तब, मारहाणीचा व्हिडिओही सापडला…


बीड : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. CID च्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराड हा या हत्येचा प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेग येणार आहे. याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांना सुदर्शन घुलेने मारहाण करतानाचा व्हिडीओ CID कडे आहे. या व्हिडीओच्या आधारे तपास अधिक पुढे नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

CID पुढील काही दिवसांत आणखी पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करणार असल्याचे समजते. तपासात पाच साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून, त्यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आले आहेत. बीड शहरात कराडची दहशत असल्याचेही CID ने आरोपपत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, सुदर्शन नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती. ६ डिसेंबरला संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्यात जोरदार वाद झाला. CID च्या आरोपपत्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे. याबाबत CID च्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती.

असे असताना मात्र, संतोष देशमुख यांनी याला ठाम विरोध केला. यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असे CID च्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार तर आरोप क्रमांक दोनमध्ये विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आता प्रकरण पूर्ण बाहेर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!