सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूरनंतर करणार मोठी घोषणा?


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाल आज रात्री 8 वाजता संबोधित करणार आहेत. सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असतानाच आता मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. अजूनही पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत.

शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. असे असतानाच आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. यामुळे ते नेमकं काय बोलणार हे लवकरच समजेल.

मोदी यांच्या संबोधनाआधी गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने पत्रकार परिषदा घेऊन ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये नेमकं कशाप्रकारे हल्ले झाले, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. ही चर्चा होत असतानाच आता मोदी देशाला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे मोदी यांच्या संबोधनात नेमकं काय असणार आहे? ते देशाला नेमकं काय सांगणार आहेत? याची उस्तुकता सर्वांनाच लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात मोठा निर्णय घेण्याआधी अशा प्रकारे देशाला संबोधित करतात, असे सांगितले जात आहे. आता मोदी आज देशाशी बातचित करणार आहेत. यामध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!