सर्वांत मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का, ईडीकडून आरोपपत्र दाखल, नेमकं घडतंय काय?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांच्यावरआरोपपत्र दाखल केलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता.

याबाबत तपास अधिकाऱ्यांनी शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता त्यांच्या नातेवाईकांना खासगी व्यक्तींना कवडीमोल किंमतीत सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप केला. यामुळे याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

ईडीकडून रोहित पवार आणि काही जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाकडून या आरोपपत्राची दखल घेणे अद्याप बाकी आहे. यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती अशी की, २०२३ मध्ये, एजन्सीने बारामती ॲग्रोची ५०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली, ज्यात १६१.३० एकर जमीन, एक साखर कारखाना, मशिनरी, इमारतींचा समावेश आहे.

       

गेल्या वर्षी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोसह अन्य संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. नंतर रोहित पवार यांना ईडीच्या मुंबई  कार्यालयात समन्स बजावण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हापासून हे प्रकरण गाजत आहे. याबाबत अजून तपास सुरू आहे.

दरम्यान, मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडची आहे, जी बारामती ॲग्रोने कथितरित्या rigged लिलावाद्वारे विकत घेतली. एजन्सीनुसार, ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळवलेली असल्यामुळे, हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन आहे. असा इडीचा दावा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!