बिग बॉस चाहते हैं… नव्या सीझनमध्ये नसणार हा आवाज, बिग बॉस १९ मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट…


मुंबई : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. टीव्ही आणि जियो हॉटस्टारवर शो प्रसारित होणार आहे. पण यंदाचा हा सीझन आधीच्या कोणत्याही सीझनपेक्षा वेगळा आणि धक्कादायक ठरणार आहे.

कारण यंदा बिग बॉसमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ५ मोठे बदल करण्यात आले आहेत. सलमान खान याने ‘बिग बॉस 19’ साठी प्रोमो शूट केला अशी माहिती समोर आली आहे.

आता शोबद्दल नवीन अपडेट समोर आलं आहे. शोमध्ये ‘बिग बॉस चाहते हैं…’ हा डायलॉग आता प्रेक्षकांना ऐकू येणार नाही. तर शोमध्ये २ थीम असून महत्त्वाचे ५ बदल यंदाच्या सीझनमध्ये करण्यात आले आहेत.

बिग बॉस १९ मध्ये ‘बिग बॉस चाहते हैं…’ हा डायलॉग ऐकायला मिळणार नाही. त्याऐवजी आता ‘बिग बॉस जानता चाहते हैं…’ असं नवीन संवाद असणार आहे. गेल्या अनेक सीझनपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला आवाज आणि संवाद बदलण्याचा निर्णय प्रेक्षकांना नक्कीच धक्का देणारा आहे.

आता स्पर्धकांना घर चालवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. कोणत्या स्पर्धकाला कोणतं काम करायचं, रेशनचं नियोजन, कामांची विभागणी – हे सर्व स्पर्धक स्वतः ठरवतील. बिग बॉस यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. यामुळे घरात अधिक गोंधळ, वाद आणि राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यंदा बिग बॉस १९ मध्ये दोन थीम असणार आहेत – (राजकीय) आणि (मागे फिरणं). या थीमनुसारच स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. राजकीय विषयांवर चर्चेत असलेले, किंवा पूर्वी चर्चेत आलेले स्पर्धक निवडले जाणार आहेत.

असल्याचं सांगितलं जात आहे. हे तीन होस्ट्स वेगवेगळ्या टप्प्यांवर शो होस्ट करणार असल्याचं संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

स्पर्धकांची थीमनुसार निवड ..
शोमधील स्पर्धक हे ‘थीम’शी संबंधित असतील. उदाहरणार्थ – ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ वादामुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा मुखीजाशी संपर्क साधला गेल्याचं वृत्त आहे. राजकीय, सामाजिक किंवा मनोरंजनविश्वातील चर्चेत असलेले चेहरे या सीझनमध्ये दिसू शकतात.

दरम्यान, २० ऑगस्टपर्यंत शोच्या सेटचं काम पूर्ण होणार असून, २८ ऑगस्टला सलमान खानचा प्रोमो शूट केला जाणार आहे. तर २९ ऑगस्टला स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सचं शूटिंग होईल. यानंतर शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!