Bigg Boss 17 Winner : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा विजेता, ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये..


Bigg Boss 17 Winner : छोट्या पडद्यावरील बिग बॉस-१७ या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्राहे बिग बॉस-१७ या कार्यक्रमाचे टॉप-३ स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-१७ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

सलमान खानने मुनव्वर फारुकीला बिग बॉस-१७ या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे. काल बिग बॉस-१७ या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. मुनव्वर हा बिग बॉस-१७ या कार्यक्रमाचा महाविजेता ठरला आहे.

यंदा ‘बिग बॉस’च्या टॉप २ मध्ये मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी डोंगरीला जाणार की, गोबिंदगढला याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर मुनव्वरने या स्पर्धेत बाजी मारली आहे. तर अभिषेक कुमार या पर्वाचा उपविजेता ठरला आहे. Bigg Boss 17 Winner

मुनव्वरचा काल वाढदिवस होता, मुनव्वरसाठी त्याचा हा वाढदिवस खास ठरला आहे, कारण त्याला बिग बॉस-१७ ची ट्रॉफी मिळाली आहे. मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो.

मुनव्वर त्याच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!