लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून मोठा राडा, महिला संतापल्या, E-KYC केली, तरीही..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र, या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या. ज्याीवेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र, अनेक महिलांनी अर्ज करताना नियम आणि अटी बाजूला सारून अर्ज केले.

आता महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी बारीकपणे केली जात आहेत. यासोबतच ईकेवायसीचीही अट ठेवण्यात आली. यादरम्यान केवाएसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याची ओरड अनेक महिलांची आहे.

ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी गोंधळ घातल्याचे बघायला मिळाले. गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून घेतल्याचा प्रकार. महिला पैसे न मिळाल्याने गोंधळ घातल होत्या.

लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!