महाराष्ट्रात मोठा घोळ! लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त, कसा झाला हा चमत्कार? राहुल गांधींनी आज पुरावाच दिला…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यामुळे याबाबत चर्चा सुरु आहे.
याबाबत आजही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब टाकला. याबाबत ते म्हणाले, निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांनी त्यासाठी थेट पुरावा पण सादर केला. आदित्य श्रीवास्वत नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आयोगाने आम्हाला डेटा दिला नाही. पण आम्ही त्यांना पुरावे दिले असा टोला त्यांनी लगावला. लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय होतो. तर पाचच महिन्यानंतर विधानसभेला पराभव होतो, त्यामागील कारणं त्यांनी सांगितली आहेत.
राहुल गांधी म्हणाले, मत चोरी भारताविरोधात आणि भारतीय राज्य घटनेविरोधात रचलेला मोठा गुन्हा आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घातला. भाजप आणि निवडणूक आयोगाने विविध राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभेत मतं चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. यावर भाजपने अजून उत्तर दिले नाही.
आम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यापासूनच दाल में कुछ काला है असं वाटत होतं. भाजपाला अँटी इनकम्बन्सी वाटत नव्हती. त्यामागील हे कारण आहे. देशात विरोधात वातावरण असताना त्याचा फटका केवळ भाजपलाच का बसत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. सत्ताविरोधी मतदानाचा लोकशाहीत सर्वांना फरक पडतो.
पण भाजपला का फटका बसला नाही. महाराष्ट्रात महिनाभर चाललेली मतदान प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे. बनावट लोकांचा मतदार यादीत समावेश हा प्रश्न आहे. मतदार यादीत मतदार वाढवले का? असा सवाल त्यांनी सुरुवातीला केला. प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका सर्व पक्षांना बसतो. पण तो भाजपलाच का बसत नाही, असेही ते म्हणाले.
लोकसभेत तिच लोक आम्हाला भरभरून मतं टाकतात. मग संशयाला भरपूर जागा उरते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 1 कोटी मतदार वाढले. मतदार यादी ही देशाची संपत्ती आहे. ती देण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली. असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.