पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट ; ‘या’ सात गावात उभारलं जाणार, शुक्रवारपासून मोजणीला सुरुवात..


पुणे : पुण्यातील पुरंदर विमानतळाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या विमानतळासाठी आता सातही गावांमधून संमती देणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी येत्या 25 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.त्यानंतर मंगळवारपर्यंत ९४ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) मोजणी करण्यात येणार असून, २० ऑक्टोबरपर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करून जमीन देण्यास संमती घेण्यास २५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. येत्या शुक्रवारपासून आता मोजणीला सुरुवात होणार आहे.

दरम्यान या विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन आहे. २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत. तालुक्यातील सातही गावांत सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन आहे. त्यामुळे सुमारे २,९०० एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!