शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट,डिस्चार्ज कधी मिळणार?डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर सायमन ग्रेट यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच सांगितल आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार औषधोपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र, प्रकृती पूर्णपणे स्थिर होण्यासाठी आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना सध्या पूर्ण विश्रांतीची गरज असल्याचे सांगितलं आहे.पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि नेते उत्सुक आहेत. मात्र, रुग्णालयातील संसर्ग टाळण्यासाठी आणि त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी सध्यातरी शरद पवारांना कुणीही भेटू नये”, अशी स्पष्ट सूचना डॉक्टरांनी दिली आहे.

शरद पवारांना छातीत संसर्ग झाला असून पाच दिवसाचा अँटिबायोटीकचा कोर्स सुरू आहे. औषधउपचारांना त्यांचा उत्तम प्रतिसाद आहे. डॉक्टरांच्या या माहितीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील चिंतेचे वातावरण आता कमी झाले आहे.

मात्र प्रकृतीमध्ये अधिक सुधारणा होईपर्यंत कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल नुसार शरद पवारांच्यावर उपचार सुरू असून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

शरद पवारांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांना आरामाची गरज आहे.पुढील काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल असे देखील डॉक्टरांनी सांगितल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!