कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची मोठी अपडेट! सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय..

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षापासून अटकेत असलेल्या सहाही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत आणि खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. तर आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश दिले आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाचा निर्णय घेतला आहे.
खरं तर गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना २०१८ ते २०१९ दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून आपण अटकेत आहोत आणि अद्याप खटला सूरू आहे. नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता कमी आहे. असा दावा करून आरोपींनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती.
त्यानुसार न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा दिला होता.
त्यामुळे कोर्टाने सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना जामीन मंजूर केला होता. तसेच याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोर्ट काय निर्णय घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.