सातारा डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच….


सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची अद्ययावत माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित म्हणून अटकेत असलेल्या गोपाल बदने याची पोलीस कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलली आहेत.

मृत तरुणीने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि तरुणी जिथं भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांवर तिने शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे याबाबतचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. तसंच डिजिटल पुरावे जमा करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या गोपाळ बदने यांनी पोलीस ठाण्यात शरण येण्याआधी आपला मोबाईल लपवला होता. त्यानंतर आता त्याची पोलीस ठाण्यातच कसून चौकशी सुरू आहे.

या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.. गोपाल बदने याची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशी, डॉक्टर महिलेच्या आत्महत्येमागील नेमके कारण आणि या प्रकरणात त्याचा संभाव्य सहभाग याबाबत अधिक माहिती उघड करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे, या प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!