लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! सप्टेंबरचा हप्ता eKYC नंतरच? जाणून घ्या महत्वाची माहिती…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच राज्य सरकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यापूर्वीच एक अपडेट समोर येत आहे. या योजनेत ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसल्याने थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजून शासन निर्णय आलेला नाही. सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतो. पण याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

       

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. पण दोन महिन्यात ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबू शकतो.

नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यपुढील हप्ते हे ई-केवायसी अभावी थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी अभावी थांबवण्यात येईल असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही.

दरम्यान, ई-केवायसी करताना पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. अपलोड आणि इतर प्रक्रिया करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता आलेली नाही.

पण ई-केवायसी केली नाही तर पुढील हप्ते थांबविण्यात येऊ शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून दीड महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे या काळात ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!