महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट: बदनेला बडतर्फ केल्यानंतर सरकारचं आणखी एक पाऊल, फास आवळणार?


सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या
प्रकरणात निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदने याला बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या तपासासाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सात अधिकाऱ्यांची एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पुणे ग्रामीण, सातारा ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात यापूर्वी स्थापन करण्यात आलेली एसआयटी केवळ तपासावर देखरेख ठेवणार होती, असा आरोप झाला होता. या आरोपांनंतर एसआयटीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आता या विशेष तपास पथकात एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक डीवायएसपी, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखीन काय उलगडा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान तपासासाठी या विशेष पथकात पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, मूळ तपास अधिकारी व फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे यांचा समावेश आहे. तसंच लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व सोलापूर ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे देखील या पथकात असणार आहेत. याशिवाय सातारा ग्रामीणचे उपनिरीक्षक अभिजीत गुरव आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांचीही नियुक्ती या तपासासाठी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!