लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं सरप्राईज! लाभार्थी महिलांना मिळणार ‘एवढे’ हजार रुपये, जाणून घ्या…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, या निवडणुकांच्या अचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास विलंब झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे जानेवारी महिन्यानंतर या योजनेतील महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसेच मिळाले नव्हते. मात्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदाच मिळणार आहेत.

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अशा देखील अनेक महिला होत्या, ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली. या योजनेसाठी आपली केवायीसी पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली होती, त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी केली आहे, मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत, ती चूक सुधारण्यासाठी आता ३१ मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

या ३१ मार्चनंतर ज्या महिलांची केवायसी राहून गेली आहे, किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा हाफ्ता बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या आर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी भरीव तरदुत करण्यात आली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!