राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! भाजपने युतीसाठी ऑफर दिली, पण…; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य…


मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपच्या स्टेजवर दिसणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचं भाजप काय करणार आहे हे माहीत नाही.

युतीचे नेमके गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असे ते म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!