शरद पवारांना मोठा धक्का! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, नेमकं घडलं काय?


पुणे : देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इनस्टीट्युटला राज्य सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येते आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मंत्री समितीने दिले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शरद पवार गटाने संताप व्यक्त केला आहे.

यावर आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात.

तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आपला मोर्चा आता ‘बारामतीकडं’ वळवल्याचा त्याचा अर्थ आहे. भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

       

हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल. महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून
संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे.

यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राज्याचे वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर शरद पवार यांनी अजून प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!