संजय राऊत यांना मोठा धक्का! कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणी निकटवर्तीय सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात..

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कोरोना काळात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली आहे.
डॉ. बिसुरे हे दहिसरच्या करोना फिल्ड रुग्णालयाचे प्रमुख होते. याच रुग्णालयाला संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली होती. त्यात सुजित पाटकर यांनी मध्यस्थी केल्याचा ईडीला संशय आहे.
राजधानी मुंबईत झालेल्या कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाईचा फास आवळण्यास काही महिन्यांपासूनच सुरुवात केली होती. जून महिन्यात ईडीने एकाच वेळी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले होते.
तेव्हा सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते. लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून सुजित पाटकर हे काम पाहात होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते.