लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ६० लाख महिला अपात्र ठरणार? नेमकं कारण काय? महत्वाची माहिती आली समोर..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, फसवणूक करत पैसेही लाटले. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. निवडणुकीनंतर निकषांच कारण देत सरकारने ई-केवायसी प्रक्रियाअनिवार्य केली.

आता याच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण याच ई-केवायसीमुळे कतब्बल 60 महिला या नावडत्या बहिणी होऊ शकतात,त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं कायमचं बंद होऊ शकतं.

निकषांच कारण देत सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाना ई-केवायसी करणं बंधकारक केलं होतं. आधी ती तारीख डिसेंबर 2025 पर्यंत होती, नंतर ई-केवायसीची मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली.

अनेक महिलांनी ई-केवायसीमध्ये चुका केल्या, ही प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. ३१ मार्च ही केवायसी दुरुस्तीची शेवटची तारीख आहे आणि यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे.

त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार आहे. ३१ मार्च अखेर एकूण २ कोटी ४७ लाख लाभार्थी महिलांपैकी ५०-६० लाख महिला या अपात्र ठरू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!