सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का! ‘या’ बँकेने EMI च्या हप्त्यात केली मोठी वाढ, जाणून घ्या…

पुणे : आता बँकांकडून मिळत असणाऱ्या कर्जामुळे कोणत्याही वस्तूची खरेदी करणे खूप सोयीस्कर झाले आहे. परंतु अनेकांना ईएमआय वेळेत भरता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच आता सर्वसामान्य जनतेला चिंतेत टाकणारी एक बातमी आहे.

कारण काही मोठ्या बँकांनी EMI च्या हप्त्यात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियासह देशातील सर्वोच्च बँकांनी निधी आधारित कर्जाच्या दरात वाढ केल्याची माहिती आहे.


दरम्यान , एचडीएफसी बँकेकडून या महिन्यापासून निवडक कालावधीसाठी MCLR ची बेंचमार्क किरकोळ किंमत 15 bps ने वाढवली आहे.
बँक ऑफ बडोदाने MCLR वाढवला असून अनेक कालावधीसाठी त्यांचे बेंचमार्क कर्जाच्या दरात ५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. तर ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने MCLR मध्ये बदल केला आहे.
