ठाकरेंना मोठा धक्का; ‘या ‘महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, काय आहे कारण?


मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे गटाने युती केली आहे. या युतीनंतर राजकीय समीकरण बदलत देखील चालली आहेत. ठाकरे गटाचे नेत्या शुभा राऊळ यांनी राजीनामा का दिला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तसेच त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत देखील माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता त्या शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईत भाजप, शिवसेना युतीसमोर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मोठं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!