मोठी बातमी! कपिल शर्माला मोठा धक्का, कॅफेवर अज्ञातांनी केला गोळीबार, नेमकं प्रकरण काय?


मुंबई : भारताचा लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा सध्या धक्क्यात आहे. त्याच्या कॅनडामधील नव्याने सुरू केलेल्या ‘Kap’s Cafe’ वर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माने कॅनडामध्ये त्यांच्या कॅफेचं उद्घाटन केलं होतं.

कपिलने आपल्या पत्नी गिन्नी चतरथसोबत मिळून कॅनडामध्ये एक भव्य रेस्टॉरंट सुरू केलं आहे. दोघांनी ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात ‘कॅप्स कॅफे’ सुरू केलं होतं. या कॅफेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) या संघटनेचा कार्यकर्ता आणि भारताच्या एनआयएकडून सर्वाधिक शोधात असलेला दहशतवादी हरजीत सिंग लाडी याने कपिल शर्माच्या काही वक्तव्यांचा हवाला देत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान, कपिल शर्माचा हा कॅफे कॅनडाच्या सरे भागात आहे. त्यांनी नुकतेच या कॅफेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी एक कार कॅफेजवळ येते आणि कॅफेच्या काचांवर गोळीबार करताना दिसते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची जबाबदारी एका कट्टरपंथी संघटनेने घेतली आहे. आता या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कथित व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून, त्यामध्ये एका व्यक्तीने वाहनाच्या आतून पिस्तुलातून किमान नऊ गोळ्या झाडताना दिसत आहे.

हरजीत सिंग लड्डी, जो पंजाबच्या नवांशहर येथील रहिवासी आहे, हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा कार्यकर्ता असून, तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या सर्वाधिक शोधात असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!