शेतकऱ्यांना मोठा धक्का!! आता हे काम केले तरच मिळणार किसान निधीचे 2 हजार रुपये, जाणून घ्या नवीन नियम…

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात ही एक महत्वाची योजना आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते.

याबाबत आता शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्री करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीची योग्य माहिती मिळवणे, त्यावर आधारित लाभ पोहोचवणे, हा या नोंदणी मागील मुख्य उद्देश आहे. याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

फार्मर रजिस्ट्री करण्यासाठी अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही, त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, फार्मर रजिस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीची योग्य माहिती मिळेल. तसेच जमिनीच्या धारणा क्षेत्रावर आधारित योजनांचा लाभ वितरित करता येईल. यामुळे गैरवापर टाळता येईल तसेच योजनेत पारदर्शकता येईल, असेही सांगण्यात आले आहे.
यासाठी आता 31 जानेवारी 2025 पूर्वी फार्मर रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची माहिती अद्ययावत ठेवावी. नाहीतर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची बाब आहे. येणाऱ्या काळात याबाबत अडचणी येऊ शकतात.
