अजित पवारांना मोठा धक्का!आरपीआय पक्षाच्या प्रमुखाची अचानक निवडणुकीतून माघार, काय आहे कारण?


पुणे:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेसाठी जोमाने ताकद लावली आहे.या निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. युती केलेले आरपीआय (खरात गट) पक्षाचे प्रमुख सचिन खरात यांनीअचानकपणे महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरपीआय (खरात) गटाशी युती केली होती. परंतु आता अजित पवार यांना आरपीआय (खरात गट) पक्षाचे प्रमुख सचिन खरात यांनी अचानकपणे महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी माझा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवार यांनी दलित मतदारांसाठी खरात यांना काही जागा दिल्या होत्या. परंतु आता खरात यांनीच निवडणुकीतून माघार घेतल्याने अजितदादांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे. ते म्हणाले,मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे.

कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला तसेच कोणत्याही उमेदवाराला माझा पाठिंबा नाही,असं खरात म्हणाले आहेत. त्यामुळेच आता अजित पवार नेमका काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!