अजित पवारांना मोठा धक्का!! तब्बल 7 आमदार फुटले, नेमकं घडतंय काय?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. नागार्लंडच्या राजकारणात मोठी उपथापालथ झाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सात आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

या आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. यामुळे सरकार अजून मजबूत झाले आहे.
त्यांची संख्या 25 वरून 120 झाली आहे. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत, म्हणजेच आता एकट्या एनडीपीपीकडे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय मिळवला होता.

तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हा राज्यातील मुख्य आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. मात्र आता या सर्व आमदारांनी सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता राजकारणाला वेगळे वळण आले आहे.
यामध्ये नामरी एन्चांग – टेनिंग विधानसभा, पिक्टो शोहे – अटोइझू विधानसभा, वाय. मोहोनबेमो हॅम्त्सो – वोखा टाउन विधानसभा, वाय. मानखाओ कोन्याक – मोन टाउन विधानसभा, ए. पोंगशी फोम – लॉंगलेंग विधानसभा, पी. लँगन – नोकलाक विधानसभा, एस. तोइहो येप्थो – विधानसभा या आमदारांचा समावेश आहे.