महाराष्ट्रात निवडणुकीत मोठा घोटाळा!! पाचच महिन्यांमध्ये मतदारांची संख्या वाढली कशी? राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगाला मतदारांची लिस्टच फोटोसहीत मागितली…
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2024/03/rahul.jpg)
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप विरोध सातत्याने करताय. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून आजची पत्रकार परिषद होती. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान २०२४ मध्ये ३२ लाख मतदार जोडले गेले. तथापि, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (महाविकास आघाडी) विजयी झालेल्या आणि विधानसभा निवडणुकांमधील ५ महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख मतदार जोडले गेले. प्रश्न असा आहे की, हे ३९ लाख मतदार कोण आहेत? ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की, महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदार लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? महाराष्ट्रात अचानक मतदार का निर्माण झाले आहेत? निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे मागूनही दिलेली नाहीत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? ५ वर्षात ४४ लाख असताना पाच महिन्यात ३९ लाख कसे आले? मतदारयादीत अनेक अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फोटोसह मतदारयादी द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.